Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमदोघांनी दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले

दोघांनी दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले

दागिने उजळून देण्याचा बहाणा; सुपा येथील घटना

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अंगातील सोन्याचे दागिने उजळून देतो अशी बतावणी करून दोघांनी सुमारे दीड लाखाचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी दुपारी सुपा येथे घडली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत तागडे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादीच्या घरी सोमवारी दुपारी दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी आम्ही कंपनीची माणसे असून भांडी घासण्याची पावडर विकत आहोत, असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्यांच्या देवघरातील भांडे त्यांच्याकडे दिली. तेवढ्यात फिर्यादीची पत्नी कुसुम तेथे आली. तेव्हा त्यातील एक जण फिर्यादीला म्हणाला, तुमच्या बायकोच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हे काळे पडलेले आहेत ते उजळून देतो. फिर्यादीच्या पत्नीने गळ्यातील सोन्याचे डोरले, कानातील फुले व वेल, गळ्यातील सोन्याचे गंठण असे दागिने त्या व्यक्तीकडे दिले.

दागिने उजळण्यासाठी गरम पाणी लागेल असे सांगून फिर्यादीच्या पत्नीसोबत किचनमध्ये गेला. दुसरा व्यक्ती फिर्यादीसोबत बोलत उभा होता. काही वेळाने घरात गेलेला व्यक्ती व फिर्यादीसोबत बोलत असलेला व्यक्ती निघून गेले. फिर्यादी यांनी पत्नीकडे दागिने दिले का? अशी विचारणा केली असता त्यांनी दानिगे दिले नसल्याचे सांगितले. त्या दोघांचा फिर्यादीसह इतरांनी सुपा गावात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी सुपा पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू अनोळखी व्यक्ती जवळ देऊ नये, फेरीवाल्यापासून सावध राहावे, आपल्या गल्लीत, सोसायटीत अनोळखी व्यक्ती पुन्हा पुन्हा फेर्‍या मारत असेल तर त्याच्यावर नजर ठेवावी अथवा तात्काळ पोलिसांना कळवावे.
– अरुण आव्हाड, पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस ठाणे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या