Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवृद्ध महिलेच्या गळ्यातून पोत लांबवली

वृद्ध महिलेच्या गळ्यातून पोत लांबवली

सिन्नर / ठाणगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील पाडळी येथे भरदिवसा एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली.

लक्ष्मीबाई अर्जुन शिंदे या बँकेच्या कामानिमित्त ठाणगाव येथे गेल्या होत्या. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्या ठाणगावहून पाडळी फाट्यावर उतरल्या. अपंगत्वामुळे त्या पातळेश्वर विद्यालयाजवळून हळूहळू घराकडे पायी जात असताना त्यांच्या मागून स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने त्यांना गावात सोडण्याची तयारी दर्शवली.

सुरुवातीला लक्ष्मीबाईंनी त्याला नकार दिला. मात्र, तुम्हाला चालत जायला जास्त वेळ लागेल, असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने त्यांना पाडळी येथील खंडोबा मंदिराजवळ सोडले. त्या दुचाकीवरून उतरताच आरोपीने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे डोरले आणि अर्धा तोळ्याचे सोन्याचे मणी, अशी सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पोत झडप घालून हिसकावली आणि क्षणार्धात दुचाकीसह पळ काढला.

लक्ष्मीबाईंनी आरडाओरडा केला, मात्र त्या ठिकाणी कोणीही नसल्याने चोरटा पसार झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या नातू कैलास शिंदे यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश रेवगडे पोलीसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : आत्मविश्वास की वास्तवाशी फारकत?

0
नाशिक / शैलेंद्र तनपुरे - दै. देशदूत - संपादक बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी एक आव्हान देणारी उक्ती मराठी भाषेत आहे....