Monday, October 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMPSC अध्यक्ष विवेक भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य; तुकाराम मुंढे एमपीएसी आयोगाचे...

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य; तुकाराम मुंढे एमपीएसी आयोगाचे सचिव म्हणून काम पाहणार – मंत्री शिवेंद्रराजेंची घोषणा

पुणे :

- Advertisement -

MPSC संदर्भात आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीममवार यांचा राजीनामा घ्यावा, ही त्यामधील प्रमुख मागणी आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आता हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी रोहित पवार आणि आंदोलकांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, शिवेंद्रराजेंनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदा हा रोहित पवारांकडे सुपूर्त केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी महायुती सरकारने अमान्य केल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे तर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे एमपीएससी आयोगाचे सचिव म्हणून काम पाहणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे यांनी दिली आहे.

एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांनंतर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासह संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.


ताज्या बातम्या

सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

0
सप्तशृंगी गड | प्रतिनिधी Nashik / Saptshrungi Gad आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ...