Tuesday, October 13, 2026
HomeनगरAccident News : तीन दुचाकींच्या अपघातात दोन ठार; 5 जण जखमी

Accident News : तीन दुचाकींच्या अपघातात दोन ठार; 5 जण जखमी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील (Newasa Shrirampur Road) एस कॉर्नर जवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात (Accident) दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी असून दोन जण किरकोळ जखमी आहेत. याबाबत माहिती अशी की, दोन दुचाकीवरून तीन तरुण व दोन तरुणी नाशिक (Nashik) येथून नेवाशाकडे (Newasa) येत असताना त्यांच्या स्कूटी दुचाकी (एमएच 15 जेएल 2983) व दुसरी दुचाकी (एमएच 15 एचडी 1389) या वाहनांची नेवाशाकडून श्रीरामपूरकडे जाणार्‍या दुचाकीला (एमएच 17 सीडब्ल्यू 2668) धडक होवून झालेल्या अपघातात एका तरुणीसह एक तरुण ठार (Death) झाला. तर दोनजण गंभीर जखमी आहेत.

- Advertisement -

मृतांमध्ये स्वाती सोमनाथ जाधव (क्रांतीनगर, नाशिक) व गणेश मछिंद्र गायकवाड (निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर) या दोघांचा समावेश आहे. तर ऋषिकेश रवींद्र गोडे (पंचवटी, नाशिक), श्रावणी संतोष निकम (फुलेनगर, नाशिक), व ओम प्रवीण परदेशी (वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) हे तिघे गंभीर जखमी असून विशाल शंकर गुंजाळ (शांतीनगर, नाशिक), यश समाधान पडघन (क्रांतीनगर नाशिक) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामपूरकडे (Shrirampur) जाणार्‍या दुचाकीवरील तरुण ज्योत घेवून गावाकडे जात होते तर नाशिकमधील (Nashik) तरुण कुठे जात होते हे समजले नाही. अपघातात (Accident) तिन्ही दुचाकींचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सिल्व्हर ओकमध्ये खलबतं

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट...