मुंबई | Mumbai
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात गेल्या सहा वर्षापासून अटकेत असलेल्या सहाही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. किलोर यांनी या हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘बऱ्याच कालावधीपासून हत्या प्रकरणातील आरोपी कारावासात आहेत. प्रदीर्घ कारावास भोगलेल्या या आरोपींचा जामीन अर्ज मी स्विकारत आहे. आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे.’
त्यामुळे आता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहाही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण या जामीननंतर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचं गुढ अजूनही उलगडले नाही आहे. अजूनही हत्येच गुढ उलगडण्यात तपास यंत्रणांना यश आलेले नाही आहे. तसेच तपास यंत्रणेने दाखल केलेले पुरावे यावर कोर्ट देखील असमाधीनी आहे. त्यामुळेच या पानसरे यांच्या हत्येचा उलगडा होण्यास उशीर होतोय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा