Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGovinda Bullet Injury : गोळी लागल्यावर गोविंदाची ICUमधून पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Govinda Bullet Injury : गोळी लागल्यावर गोविंदाची ICUमधून पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

मुंबई | Mumbai

अभिनेता गोविंदाच्या पायाला बंदुकीची (Actor Govinda Bullet Injury ) गोळी लागली होती. बंदुक साफ करत असतान आज पहाटे ही दुर्घटना घडली होती.

- Advertisement -

गोळी त्यांच्या गुडघ्याला लागली. त्यांच्यावर सध्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता गोविंदाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

एका ऑडिओ क्लिपद्वारे गोविंदाने प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पायाला गोळी लागली होती आणि ती काढण्यात आली आहे. मी डॉक्टरांचे आणि सर्व चाहत्यांचे खूप आभार मानतो. तुमच्या प्रेमासाठी आणि तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो”, असं तो या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतोय. पायातून गोळी काढल्यानंतर गोविंदाने हा ऑडिओ रेकॉर्ड केला आहे. त्याद्वारे त्याने प्रकृतीची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. गोळीबाराचा आवाज येताच घरामध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची पोलिसांनी दिली आहे. तसेच गोविंदाची प्रकृतीही स्थिर आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या