मुंबई | Mumbai
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून नुकतेच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता उर्वरित टप्प्यातील मतदान १३, २०, २५ मे आणि १ जून रोजी होणार असून ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, अशातच आता लोकसभेची निवडणूक सुरु असताना महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Legislative Council) चार जागांवरील निवडणूक जाहीर झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduates and Teachers) निवडणुका (Election) जाहीर झाल्या असून यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर व मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या चारही मतदारसंघासाठी १० जूनला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या या चारही मतदारसंघाच्या आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपणार असल्याने त्याआधी या निवडणुका होत आहेत.
हे देखील वाचा : राज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ‘ही’ याचिका फेटाळली
दरम्यान, विधानपरिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
असा आहे निवडणुक कार्यक्रम
१५ ते २२ मे – अर्ज दाखल करण्याची मुदत
२४ मे – अर्जाची छाननी
२७ मे – माघार घेण्याची मुदत
१० जून – मतदान
१३ जून – मतमोजणी
हे देखील वाचा : Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून
या चार आमदारांचा कार्यकाळ संपणार
विलास पोतनीस – मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
निरंजन देवखरे – कोकण पदवीधर (भाजप)
किशोर दराडे – नाशिक शिक्षक (ठाकरे गट)
कपिल पाटील – मुंबई शिक्षक (लोकभारती पक्ष)