Saturday, June 13, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Shrirampur : श्रीरामपूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

बेलापूर बुद्रुक महिला राखीव, बेलापूर खुर्द, भेर्डापूर, माळवाडगाव खुले, उक्कलगाव ओबीसी, दत्तनगर अनु. जाती तर टाकळीभान अनु. जमातीसाठी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील 52 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत काल काढण्यात आली. यामध्ये बेलापूर बुद्रुक, गळनिंब, गोंडेगाव, नाऊर या मोठ्या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर पढेगाव, निपाणी वडगाव व वडाळा महादेव यांना अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले आहे. बेलापूर खुर्द, भोकर, माळवडगाव, फत्याबाद, भेर्डापूर खुले (सर्वसाधारण) झाले आहे. 52 गावातील सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती 13, अनुसूचित जमाती 8, इतर मागास प्रवर्ग 14 तर सर्वसाधारणला 17 जागा मिळाल्या आहेत.

- Advertisement -

येथील प्रशासकीय सभागृहात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सरपंच पदाचे आरक्षण सर्व नियमांच्या आधारे करून ही सोडत काढली. यात अनुसूचित जातीमध्ये गोवर्धनपूर, मातुलठाण (महिला), मांडवे (महिला), कुरणपूर (महिला), दत्तनगर, पढेगाव, निपाणीवडगाव, वडाळा महादेव महिला), खानापूर (महिला), उंबरगाव, निमगावखैरी (महिला), मालुंजा बुद्रुक, लाडगाव (महिला) तर अनुसूचित जमाती – खोकर, ब्राम्हणगाव वेताळ (महिला), टाकळीभान, रामपूर (महिला), भैरवनाथनगर, माळेवाडी (महिला), वळदगाव (महिला), महांकाळवडगाव या गावांचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) भामाठाण (महिला) (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), एकलहरे (महिला), गुजरवाडी (महिला), हरेगाव (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), जाफ्राबाद, खंडाळा (महिला), खिर्डी, शिरसगाव, उक्कलगाव, उंदिरगाव (महिला), वांगी बुद्रुक (महिला), वांगी खुर्द., कान्हेगाव, कारेगाव (महिला) तर
सर्वसाधारमध्ये- बेलापूर बुद्रूक (महिला), बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्याबाद, गळनिंब (महिला), घुमनदेव (महिला), गोंडेगाव (महिला), कडीत बुद्रुक, कमालपूर, माळवडगाव, मातापूर (महिला), मुठेवाडगाव (महिला), नाऊर (महिला), नायगाव (महिला), सराला (महिला) अशा पध्दतीने आरक्षण टाकण्यात आले आहे.

बेलापूर बुद्रुकचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. आता ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. तसेच टाकळीभान ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जाती महिला होते, ते आता अनुसूचित जमाती झाले आहे. याठिकाणी लोकसंध्येचा निकष लावण्यात आला. भोकर या अगोदर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला होते. आता सर्वसाधारण सरपंचपद लाभले आहे. खोकर सरपंचपद अनुसूचित जाती महिला होते. आता अनुसूचित जमाती सरपंच राहणार आहे. उक्कलगाव ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जाती महिला होते. आता ती संधी इतर मागास प्रवर्गाला मिळाली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...