Saturday, May 9, 2026
HomeनगरAhilyanagar : ग्रामपंचायतींच्या 90 जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

Ahilyanagar : ग्रामपंचायतींच्या 90 जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

771 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवर 13 तारखेपर्यंत हरकती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. या प्रभाग रचनेवर 13 तारेखपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार असून पुढील महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. तसेच 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या 90 जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून यामुळे या ठिकाणी निवडणुकांची धांदल उडणार आहे.

- Advertisement -

शासनाने 17 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार, 30 मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. आता अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी काळात होणार्‍या 771 ग्रामपंचायती प्रारूप रचना मंगळवारी जाहीर केली आहे. 2022 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजीनामा, निधन, अनहर्त यासह इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यात 85 ग्रामपंचायत सदस्य व 5 सरपंच निवडीसाठी निवडणूक पार पडत आहे. पोटनिवडणूक सुरू असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाकडून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. निवडणूक काळात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, राहाता 25, नगर 59, श्रीरामपूर 27, राहुरी 44, नेवासा 59, पाथर्डी 79, शेवगाव 48, कर्जत 56, जामखेड 49, पारनेर 88, श्रीगोंदा 62 असा आहे.

4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना
जिल्ह्यातील 771 ग्रामपंचायतीमध्ये डिसेंबर 2026 पर्यंत निवडणुका होणार आहेत. प्रशासनाकडून प्रारूप रचना जाहीर करण्यात आलेली आहे. 13 एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती नोंदविता येतील. 23 एप्रिलपर्यंत प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. निवडणूक आयोगाने मान्यतेनंतर 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
प्रशासनाकडून 30 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आली आहे. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. 15 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची पडताळणी होईल. 17 एप्रिल रोजी अर्ज मागे घेणे तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 28 एप्रिल रोजी पोट निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 29 एप्रिल रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ मे २०२६ – राजभवनाचा राजकीय अडथळा

0
तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर दक्षिण भारताच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून तामिळनाडूच्या...