Friday, May 3, 2024
Homeनगरग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस

ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचातीसह 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठी पुढील महिन्यांत 5 नोव्हेंबर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी असून मंगळवार (दि.17) अखरे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 7 तर सरपंच पदासाठी अवघे 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चालू महिन्यांत 3 ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. निवडणुकीची घोषणा केल्याच्या दिवसापासून त्यात्या भागात आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणूका होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबर मुदत असून दाखल नामनिर्देशनपत्रांची छानणी 23 ऑक्टोबर होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून मतमोजणी 6 नोव्हेंबर मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे.

दरम्यान, मंगळवार (दि.17) अखेर जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अवघे सात अर्ज दाखल झालेले आहेत. यात शेवगाव तालुक्यातील 3, संगमनेर तालुक्यातून 2 पारनेर 1 आणि नेवासा तालुक्यातून प्रत्येकी 1 अर्ज दाखल झालेला आहे. तर सरपंच पदासाठी शेवगाव तालुक्यातून 1 आणि संगमनेर तालुक्यातून 2 असे अवघे 3 अर्ज दाखल झालेले आहेत. आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस बाकी असून याकाळात उमेदवारी अर्ज ऑफलाईन दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या