Wednesday, October 21, 2026
Homeनगरटाकळीभान येथे पाटचारीच्या पाण्यात पडल्याने तरूणाचा मृत्यू

टाकळीभान येथे पाटचारीच्या पाण्यात पडल्याने तरूणाचा मृत्यू

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ऋषिकेश नामदेव कांबळे ( वय 30) या तरूणाचा पाटचारी नं.16 च्या वाहत्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवार दि.23 च्या रात्री ऋषिकेश हा पाण्यात पडला असल्याचे बोलले जात आहे. गुरूवार दि.24 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान एक वाटसरु पेट्रोल भरण्यासाठी या रस्त्याने जात असताना पाण्यात मृतदेह असल्याचे त्याला दिसून आले. संबधित व्यक्तीने आसपास असणार्‍या शेतकर्‍याना ही बाब सांगीतली असता मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली.

- Advertisement -

सध्या भंडारदरा जलाशयातून चारी नं.16 द्वारे शेतीसाठी आवर्तन सुरू असल्याने पाणी वाहते आहे. याच पाण्यात सदर मृतदेह पाण्याखाली काही प्रमाणात असल्याने ओळख पटविणे अवघड झाले होते. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर ऋषिकेश याची वस्ती आहे. त्यानंतर ऋषिकेश याचे वडील नामदेव कांबळे या ठिकाणी आले असता त्यांनी हा आपलाच मुलगा असल्याचे सांगीतले. रात्री दुचाकीवर येत असतानी ताबा सुटून ऋषिकेश हा चारीच्या पाण्यात पडला असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

याबाबतची खबर तालुका पोलीस स्टेशनला देण्यात आल्याने पोलीस मदतनिस बाबा सय्यद हे घटनास्थळी हजर झाले. सदर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी साखर कामगार रूग्णालयात पाठविण्यात आला. सायंकाळी 5 वाजता ऋषिकेश कांबळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, चुलते, चुलत भाऊ, बहिणी असा परिवार आहे. गुर्‍हाळ व्यावसायीक नामदेव कांबळे यांचा ऋषिकेश हा मुलगा तर कांदा व्यापारी आनंद कांबळे यांचा चुलतभाऊ होत.

ताज्या बातम्या

दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार; म्हणाले ‘२०१९...

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला. मुंबईतील गोरेगाव येथील...