Wednesday, October 7, 2026
Homeनाशिकब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसला ग्रीन लीडरशिप अवॉर्ड

ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसला ग्रीन लीडरशिप अवॉर्ड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

  नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ ब्रह्मा हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, नाशिक या संस्थेस नवी दिल्ली येथील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्था या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने ग्रीन लीडरशिप अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ब्रह्मा हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

   हा पुरस्कार स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार, ओएनजीसी चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सराफ, पीएचडीसीसीआय पर्यावरण समिती व आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदचे अध्यक्ष डॉ. जे. पी. गुप्ता आणि डॉ. रणजित मेहता, सरचिटणीस व मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे प्रदान केला.

   नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद-२०२५ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा परिसंवाद झाला. प्रामुख्याने मक्यापासून इथेनॉल बनवण्याबाबत या परिसंवादामध्ये देश विदेशातील २०० ते ३०० शास्त्रज्ञांनी भाग घेतला. देशातील १० संस्थांना हा ग्रीन लीडरशिप अवॉर्ड दिला जातो. सध्या ऊसापासून इथेनॉल तयार होते.परंतु, भारत देशामध्ये मक्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, पेट्रोलमध्ये सध्या ८ ते ११ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचा वापर केला जातो.

मक्यापासून कार्बन विरहित इथेनॉल बनवण्यावरती मोठे संशोधन झाले आहे. मक्या मध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हरायटीजचे संशोधनाचे काम सुद्धा या संस्थेकडून सुरू आहे आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉल तयार करून पेट्रोलबाबत देशाला स्वावलंबी बनविण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे. देशातील ज्या संस्थांनी पर्यावरणावरती संतुलन राखून ग्रीन बिल्डिंग, मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड आणि नैसर्गिक समतोल राखून काम केले आहे आणि काही संस्था संशोधनामध्ये ग्रीन एनर्जीच्या बाबतीत संशोधनामध्ये काम करत आहेत. अशाही काही संस्थांना हा अवार्ड राष्ट्रीय स्तरावरती दिला जातो. नाशिक शहरात व जिल्ह्यात ब्रह्मा हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस ला हा अवार्ड मिळण्याचा पहिला मान मिळाला आहे.

  राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांनी नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ ही ग्रामीण भागात शिक्षण संस्था स्थापन करून आदिवासी व दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर तेथे झाडांची लागवड, ग्रीन बिल्डींग तसेच सोलर एनर्जी वापरही त्या ठिकाणी चालू आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले काम उभे केल्या बद्दल हा अवार्ड मिळाला असल्याचे त्यांनी सांगतिले.

  ब्रह्मा हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, संस्थेचे विश्वस्थ मंडळ, प्राचार्य, शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांचे हा अवार्ड मिळवण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. 

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सुजय विखे, आ. राजळे, आ. लहामटे तसेच जगताप यांच्या...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे, आ. किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार...