Monday, October 14, 2024
Homeनगरसंगमनेरमधील व्यावसायीकाची प्रवरा नदीत आत्महत्या

संगमनेरमधील व्यावसायीकाची प्रवरा नदीत आत्महत्या

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील किराणा दुकानदार (Grocery Shopkeeper) व्यावसायिकाने मंगळवारी (दि. 1) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात (Pravra River) उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी (Sangamner City Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की श्याम अंबादास सिरसुल्ला (वय 52, रा. मालदाड रोड, संगमनेर) यांचे इंदिरानगरमध्ये वैभव प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी साधारण दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पुलावरुन प्रवरा नदीपात्रात उडी मारत आत्महत्या (Pravra River Suicide) केली. त्यानंतर दोन तासांनी एक किलोमीटर अंतरावरील खराडी शिवारात अडीच वाजेच्या सुमारास काही तरुणांना अज्ञात इसम मृतावस्थेत वाहून येत असल्याचा दिसला. त्यांनी सदर मृतदेह काठावर आणून त्यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर टाकली.

त्यानंतर काही वेळातच मृतदेहाची ओळख पटली. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्यचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या