Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : जीएसटी कमी झाल्यानं जुन्या गाडी विक्रेत्यांची चिंता वाढली

Ahilyanagar : जीएसटी कमी झाल्यानं जुन्या गाडी विक्रेत्यांची चिंता वाढली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जीएसटी कमी झाल्याने नव्या कारवरचा कर जवळपास 60 हजार ते 1.5 लाख रुपयांनी घटला आहे. त्यामुळे अनेकांनी वाहने दसरा-दिवाळीला खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन खरेदी सध्या कमी होत आहे. तर या कर कपातीचा परिणाम जुन्या कार विक्रेत्यांवर होणार आहे. कारण नव्या गाड्यांची किंमती कमी होणार असल्याने जुन्या गाड्यांची विक्री कमी होणार आहे. परिणामी जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणारांची चिंता वाढली आहे. हिच परिस्थिती दुचाकी वाहनांचीही होणार आहे.

- Advertisement -

अल्टो, वॅगनआरपासून ते नेक्सॉन, थ्रीएक्सओ, आय 10, आय 20 अशा विविध कारच्या किंमतींमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत कार खरेदी करणार्‍या ग्राहकांना आता पश्चात्तापाची भावना होऊ शकते. याशिवाय वापरलेल्या गाड्या विकून कमिशन घेणार्‍या कंपन्या आणि डीलर्स यांनाही याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

डीलर्स आधीच्या कार मालकांकडून विविध कारणे पुढे करून कमी किंमतीत गाड्या घेतात आणि नंतर त्या दुसर्‍या ग्राहकांना जास्त दर लावून, मोठा नफा ठेवून विकतात. करोनाच्या काळापासून सेकंड हँड कारच्या बाजारात एवढी वाढ झाली होती की, किंमती पाहून अनेकांना नवीन गाडीच घ्यावीशी वाटे, पण बजेटमध्ये बसत नसे. मात्र, जीएसटी कपात झाल्याने या गाड्या पुन्हा एकदा खरेदीदारांच्या बजेटमध्ये आल्या आहेत. त्यामुळे डीलर्सना आता गाड्यांच्या जास्तीच्या किंमती ठेवणे कठीण होणार आहे.

या जीएसटी दरकपातीमुळे कारच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने डीलर्सना कमी नफ्यावर किंवा कधीकधी खरेदीपेक्षा कमी दरातही गाड्या विकाव्या लागतील. इतकंच नाही तर ज्या व्यक्तींना स्वतःची जुनी गाडी विकायची आहे, त्यांनाही याचा तोटा सोसावा लागणार आहे. कारण त्यांना त्यांच्या वाहनासाठी अपेक्षित किंमत मिळणार नाही. म्हणजेच, एकूण पाहता जीएसटी दरकपातीचा फायदा नवीन कार खरेदीदारांना मिळत असला तरी सेकंड हँड कार बाजारात मोठा गोंधळ आणि तोटा निर्माण झालेला आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६ जाहीर

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण - २०२६ ला मंगळवारी...