Wednesday, May 6, 2026
Homeदेश विदेशGST Tax Change: जीएसटी करकपात लागू; कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त, कोणत्या महाग?...

GST Tax Change: जीएसटी करकपात लागू; कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त, कोणत्या महाग? वाचा संपूर्ण यादी

मुंबई | Mumbai
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी वस्तू व सेवा करात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानुसार जीएसटी कराचे १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला होता. त्यानुसार आजपासून १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५ आणि १८ टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब असणार आहे. त्याची अंमलबजावनी आजपासून सुरु झाली आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी, कार, बाईक, मोबाईल अशा अनेक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

दररोजच्या वापरात येणाऱ्या दूध, कॉफी, कंडेंस्ड मिल्क, बिस्कीट,लोणी, धान्ये, कॉर्नफ्लेक्स, २० लिटरचा पाण्याचा जार, सुकामेवा, फळांचा रस, तूप, आईस्क्रीम, जाम आणि जेली, केचअप, स्नॅक्स, चीज, पेस्ट्री, सॉसेज आणि मीट, नारळ पाणी या सारख्या खाण्या पिण्याच्या गोष्टी स्वस्त होतील. याशिवाय आफ्टर-शेव लोशन, फेस क्रीम, फेस पाउडर, हेअर ऑयल, शाम्पू, शेविंग क्रीम, टॅल्कम पाऊडर, टूथब्रश आणि टॉयलेट सोपचे दर कमी होतील. तसेच, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये एअर कंडीशनर, डिशवॉशर, टीव्ही,वॉशिंग मशीनचे दर घटतील. औषधांच्या किमती देखील कमी होणार आहेत.

- Advertisement -

औषधांच्या किमती कमी होणार आहे
डायग्नोस्टिक कीट, ग्लूकोमीटर यासारख्या उपकरणांवरील जीएसटी कमी करुन 5 टक्के करण्यात आली आहे. तसेच, महत्त्वाचे म्हणजे औषधांच्या दुकानांना जीएसटी रिफॉर्म लक्षात घेत एमआरपीमध्ये बदल करुन किंवा औषधे कमी दराने विकण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये अ‍ॅगाल्सिडेस बीटा, इमिग्लुसेरेस, एप्टाकॉग अल्फा अ‍ॅक्टिव्हेटेड रीकॉम्बीनंट कोग्युलेशन फॅक्टर वीला, ओनासेम्नोजीन अबेपारव्होव्हेक, एस्किमिनिब, मेपोलिझुमॅब, पेजिलेटेड लिपोसोमल इरिनोटेकन, डाराटुमुमॅब, टेक्लिस्टामाब, अमिवंतामॅब, अ‍ॅलेक्टीनिब, रिसडिप्लाम, ओबिनुतुझुमॅब, पोलाटुझुमॅब वेडोटिन, एन्ट्रेक्टीनिब, एटेझोलिझुमॅब, स्पेसोलिमाब, वेलाग्लुसेरेस अल्फा, अ‍ॅगाल्सिडेस अल्फा, रुरिओक्टोकॉग अल्फा पेगोल, इडर्सल्फेस, अल्ग्लुकोसिडेस अल्फा, लॅरोनिडेस, ओलिपुडेस अल्फा, टेपोटिनिब, अ‍ॅव्हेलुमॅब, एमिझिझुमॅब, इत्यादी औषधांचा समावेश असणार आहे.

घरांच्या किमती होणार कमी
सीमेंटवरील २८ टक्के जीएसटी कमी करुन १८ टक्के करण्यात आली आहे. याचा परिणाम घरांच्या किंमतीवर होणार असून फ्लॅटच्या किमती कमी होणार आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळणार आहे. जीएसटी सुधारणांमुळे ऑटो सेक्टरला सर्वाधिक फायदा होणार आहे. ज्यात सेस टॅक्स ३५ ते ५० टक्क्यांनी कमी करुन ४० टक्के करण्यात आला आहे. जीएसटी सुधारणा जाहीर होताच अमूल, एचयूएल, लॉरियल आणि हिमालया यासारख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत.

जीएसटीमुळे या गोष्टी महाग
पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, जरदा, बिडी, सिगारेट, साखरेचे आणि फ्लेवर्ड शीतपेय, प्रीमियम दारू, हाय-एंड कार, इम्पोर्टेड आर्मर्ड लक्झरी सेडान (फक्त सरकारी वापरासाठी सूट), काही विशिष्ट हॉटेल्स, कोळसा, लॉटरी व काही इंटरमीडियरी सेवांचे नवीन व्हॅल्युएशन नियम यांच्या यांचे दर ४० टक्के स्लॅबमध्ये कायम ठेवले गेले आहेत. त्यामुळे या वस्तू महाग असणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Pune Crime News : पुणे पुन्हा हादरले! ७० वर्षीय आजोबाचा ९...

0
पुणे । Pune विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा माणुसकीला लाजवणारी आणि नात्यातील विश्वासार्हतेला तडा देणारी धक्कादायक घटना समोर...