Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGujrat Cabinet: गुजरातमध्ये भाकरी फिरली; मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला, कोण कोण आहे...

Gujrat Cabinet: गुजरातमध्ये भाकरी फिरली; मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला, कोण कोण आहे नव्या मंत्रीमंडळात?

गुजरात | Gujrat
गुजरातच्या राजकारणाच्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. काल (१६ ऑक्टोबर) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी सामूहिक पद्धतीने राजीनामे दिले होते. आज (१७ ऑक्टोबर) नव्या मंत्र्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. नव्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्र्यांचा समावेश असून त्यापैकी ६ चेहरे हे जुनेच आहेत. हर्ष संघवी यांनी गुजरातचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच जितेंद्र वाघाणी आणि अर्जुन मोढवाडिया यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पार पडला. या वेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पार पडला. या वेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

गुजरात मंत्रिमंडळ विस्तार :
सर्व मंत्र्यांची यादी
भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री
त्रिकम बीजल चांगा
स्वरुपजी ठाकोर
प्रत्रवणकुमार गोर्धनजी माळी
ऋतिकेश गणेशभाई पटेल
पीसी बराडा
दर्शना एम. वाघेला
कांतीलाल शिवलाल अमृतिया
वरजीभाई मोहनभाई बावलिया
रिवाबा जडेजा
अर्जून मोढवाडिया
डॉ. प्रद्यमन वाजा
कौशिक कांतीभाई वेकरिया
परशोत्तम सोलंकी
जितेंद्रभाई सावजीभाई वाघाणी
रमणभाई भीखाभाई सोलंकी
कमलेशभाई रमेशभाई पटेल
संजय सिंह महेदा
रमेशभाई भूराभाई कटारा
मनीषा राजीवभाई वकील
ईश्वर सिंह
ठाकोरभाई पटेल
प्रफुल पानसेरिया
हर्ष सांघवी
जयारामभाई गामित
नरेशभाई पटेल
कनुभाई देसाई

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...