Friday, July 24, 2026
HomeनगरCrime News : कोतूळ येथे गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा पकडला

Crime News : कोतूळ येथे गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा पकडला

एक आरोपी ताब्यात || सुमारे 6 लाख 11 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले तालुक्यातील कोतुळ येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवणार्‍या एका आरोपीवर अकोले पोलिसांनी कारवाई करत सुमारे 6 लाख 11 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा, पान मसाला, तंबाखूचा साठा तसेच एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै 2026 रोजी दुपारी 12.25 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोतूळ येथील शोएब शाबीद काझी याने आपल्या घराजवळ उभी असलेल्या स्विफ्ट कार (एमएच 02 बीडी 7599) मध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकून तपासणी केली असता वाहनामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूचा साठा आढळून आला.

यामध्ये तुलसी रॉयल जाफरानी जर्दा, रजनीगंधा फ्लेवर्ड पान मसाला, विमल पान मसाला, व्हि-1 बिग टोबॅको तसेच प्रीमियम आरएमडी पान मसाला यांचा समावेश आहे. या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह 3 लाख रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण 6 लाख 11 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शोएब शाबीद काझी याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात 485/2026 नुसार भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय मेंगाळ, अनिल कडलग, बापूसाहेब हांडे, राहुल सारवंदे व सुनील ढाकणे यांच्या पथकाने केली.

कोतूळ येथे यापूर्वी दोन वेळा गुटखा पकडण्याची मोठी कारवाई झाली होती आज तिसर्‍या वेळी देखील छापा कारवाईत गुटखा पकडला गेला. छापा कारवाईचा केवळ दिखावा केला जातो. त्यानंतर मात्र पुन्हा पाठीमागे गुटख्याचा व्यापार व्यवसाय जोरात सुरू राहतो. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

ताज्या बातम्या

सायखेडा

Nashik News: गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सायखेडा, चांदोरी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

0
चांदोरी | वार्ताहरनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सायखेड्याच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे...