Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलाखो रुपयांचा गुटखा जप्त

लाखो रुपयांचा गुटखा जप्त

- Advertisement -

ओझर | वार्ताहर Ozar

ओझर पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गुटखा व एक ट्रक जप्त केला पोलिसांनी आयशर चालकाला अटक केली आहे.

नाशिक शहर पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेकडून नाशिक ग्रामीण पोलिसांना अशोक लेलँड कंपनीचे एक आयशर वाहन क्र. (डी.डी. ०१ एफ ९४११) हा संशयास्पद रितीने नाशिक शहराची हद्द पार करून गेल्याचा संदेश प्राप्त झाला. सदर वाहन तपासण्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर ओझर पोलिसांनी दहावा मैल येथे तातडीने नाकाबंदी केली. काही वेळातच पोलिसांना सदर आयशर जानोरीकडे जातांना दिसला. पोलिसांनी हा ट्रक थांबवत चालकाकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना असमाधानकारक उत्तरे दिल्याने पोलिसांनी आयशर हा ओझर पोलीस ठाण्यात आणून त्याची तपासणी केली.

आयशरमध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या शेकडो गोण्या आढळून आल्या. याबाबत ओझर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास पत्र देत सदर मालाबाबत कळवले असता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओझर पोलिसांनी वाहन चालक संदिप मोतीलाल मालविया (रा.मोलुखेडी, ता.आस्टा, जि.सिहोर) मध्यप्रदेश यास अटक करत आयशरसह ८२ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

0
नाशिक, दि. ४ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : Nashik खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे....