Sunday, September 27, 2026
Homeक्राईमCrime News : संमतीशिवाय अर्धनग्न फोटो व्हायरल

Crime News : संमतीशिवाय अर्धनग्न फोटो व्हायरल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एका महिलेचे संमतीशिवाय अर्धनग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवरून इतरांना पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (28 जुलै) फिर्याद दाखल केली असून छत्रपती संभाजीनगर येथील शहाबाज अन्वर कुरेशी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या फिर्यादी घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले असून त्या सध्या आई-वडील व भावासह राहतात. फिर्यादीनुसार, शहाबाज अन्वर कुरेशी हा त्यांचा पूर्वीपासून परिचित असून तो नेहमी विविध कारणांवरून वाद घालून शिवीगाळ करत असे. दरम्यान, 26 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारी एक व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शहाबाज कुरेशीने पाठवलेले फिर्यादीचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो दाखवून, असे फोटो पाठवू नयेत, असे त्याला सांगण्याची विनंती केली.

त्यानंतर फिर्यादीने त्या व्यक्तीच्या मोबाईलवरून शहाबाज कुरेशी याला फोन करून फोटो इतरांना पाठवू नयेत, अशी समज दिली. मात्र, मी फोटो पाठवणार, तुला जे करायचे ते कर, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. संशयित आरोपीने त्यांच्या संमतीशिवाय अर्धनग्न अवस्थेतील फोटो आणखी तिघांच्या मोबाईलवरही पाठवले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : ‘एल निनो’चा प्रभाव कधी कमी होणार? दुष्काळ निवारणासाठी...

0
नागपूर | Nagpur राज्य सरकारकडून शनिवारी महाराष्ट्रातील (Maharashtra) २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दुष्काळी भागातील पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे...