Tuesday, December 3, 2024
Homeनाशिकपरतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

घोटी | वार्ताहर Ghoti

- Advertisement -

इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यात परतीच्या पावसाने भातपिकासह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाती काहीच पीक व उत्पन्न येणार नसल्याची परिस्थिती आहे.पावसाचे माहेरघर असणार्‍या इगतपुरी तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, भात पीकही दमदार आले आहे.

मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर जिवाणूजन्य व बुरशीजन्य या करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अडचणीत सापडली आहे.

इगतपुरी तालुक्याच्या शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे. ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्यावेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमूळे यंदा भातशेती जोमात पिकली होती. शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु ऐन दिवाळी सणासुधीच्या मोसमात सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर ढगाळ वातावरण. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणेला पंचनामे करण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी माजी आमदार निर्मला गावित यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या