Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai Rain : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले; जागोजागी साचले पाणी

Mumbai Rain : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले; जागोजागी साचले पाणी

मुंबई | Mumbai

जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सूनचे (Monsoon)आगमन झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाले होते. त्यानंतर शुक्रवार (दि.२३) रात्रीपासून मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागांत हजेरी लावली होती. यानंतर काल सकाळी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, यासह राज्यातील काही ठिकाणी पाऊस (Rain)कोसळला होता. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असून पहिल्याच पावसाने गटार तुंबून सर्वत्र पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

काल शनिवार (दि.२४) रोजी मुंबईत ११५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मुंबईला (Mumbai) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील ४८ तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला असून पहिल्याच पावसात मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा यंत्रणांचा दावा फोल ठरला आहे. तर मुंबईतील किंग्स सर्कल, अंधेरी सबवेजवळ सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

Video : पुन्हा एकदा रेल्वे अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, १२ डब्बे रुळावरून घसरले

तसेच मुंबईच्या जुहू बीच (Juhu Beach) येथे बुडणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी समुद्रातून बाहेर काढले आहे. तर अंधेरीतील सबवे परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पाणी वेगाने पुढे सरकत असताना त्यावेळी एक महिला रस्ता ओलांडू लागली. पण या पाण्याच्या वेगामुळे ती वाहून जाऊ लागली. तेवढ्यात तिथे असणारे लोक त्या महिलेच्या मदतीला आले. आणि त्या महिलेला रस्त्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचा जीव वाचला.

तर गोवंडी परिसरातील (Govandi Area) शिवाजीनगर भागामध्ये नाल्यात पडून दोन जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. हे दोघेही कंत्राटी सफाई कामगार असल्याचे समजते. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या (Mumbai NMC) नालेसफाईची पोलखोल झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Jayant Patil : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने व्हिडिओ शेअर करत सांगितले १० कारणे

- Advertisment -

ताज्या बातम्या