Saturday, July 25, 2026
HomeनगरRahuri Rain : राहुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; नद्यांना पूर, अनेक...

Rahuri Rain : राहुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

राहुरी (प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यात मागील १० तासांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. मुळा, देव, करपरा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. मुळा धरणातून तब्बल २५,००० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.

- Advertisement -

करपरा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबांच्या झोपड्यांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी या कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्यातील ओढे-नाल्यांना पूर आल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कपाशी, सोयाबीन,ऊस, मका आणि भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, दळणवळणाची साधने ठप्प झाली आहेत.

तालुक्यातील मुळानदीवरील कोंढवड, केदंळ व देवनदी वरील देसवंडी, सडे आदी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच टाकळीमिया परिसरातील नाग ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने ओढ्याकाठी राहणाऱ्या ७ ते ८ आदिवासी कुटंबे राहत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याने विळखा घातला. शिवसेना शेतकरी आघाडीचे रविंद्र मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोरखंडाच्या मदतीने ३० ते३५ लोकांना पाण्यातून बाहेर काढून मोरवाडी येथील मराठी शाळेत सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला. व वैद्यकिय मदत केली.

श्रीरामपूर ते देवळाली प्रवरा रस्त्यावर असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. परिणामी श्रीरामपूरच्या इतर भागांशी सपंर्क तुटलेला आहे. काही ठिकाणी प्रवासी व वाहनचालक अडकून पडले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : १७ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या

0
पुणे | प्रतिनिधी Pune पुणे शहरातील हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे प्रेमप्रकरणातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...