Friday, September 11, 2026
Homeनगरकरजगावसह मुळाकाठ परिसरात अतिवृष्टी; सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान

करजगावसह मुळाकाठ परिसरात अतिवृष्टी; सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान

करजगाव | वार्ताहर
नेवासा तालुक्यातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, लांडेवाडी, अंमळनेर, वाटापुर,तामसवाडीसह मुळाकाठ परिसरात गुरूवारी रात्री साडेबारा ते साडेचार वाजेपर्यंत विजेच्या गडगटासह जोरदार अतिवृष्टी झाली.

यामुळे परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असुन धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेतातुनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असुन सोयाबीन, कपाशी मका तसेच चारा पिके पाण्याखाली गेले असुन इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात राहणा-या अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे.

- Advertisement -

सुरूवातीला पाऊस न झाल्यामुळे शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिके आणली. सोंगणीस आलेली सोयाबीन, कापूस वाचण्यास आला असताना परतीच्या पावसाने मात्र शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...