Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनमाड शहरासह परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; काढणीला आलेल्या पिकांना फटका

मनमाड शहरासह परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; काढणीला आलेल्या पिकांना फटका

- Advertisement -

मनमाड | प्रतिनिधी Manmad

शहर परिसरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.मेघ गर्जना करत जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.पाऊस सुरु होताच नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहर अंधारात बुडाले होते. ग्रामीण भागात देखील चांगला पाऊस झाला त्याचा फटका गहू, कांदा यांसह इतर पिकांना बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला त्यामुळे तापमानात घट झाली असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता त्यानुसार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती मात्र शहर परिसरात गेल्या काही दिवसा पासून ढगाळ वातावरण होते मात्र आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी पडल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पाहता पाहता पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार पेठेत आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसाला सुरुवात होताच नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे शहरातील अनेक भाग अंधारात बुडाले.अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असताना तेथील वीज पुरवठा खंडित होत नाही मग आपल्या शहरातच तासंतास लाईट का जातात असा प्रश्न नागरिकांना पडला.

शहरा सोबत ग्रामीण भागात देखील पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे काढणीला आलेला गहू, कांदा, डोंगळे, मका, ज्वारी पिका सोबत उघड्यावर काढून ठेवलेला कांदा भिजून खराब झाला त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवाती पासून सूर्य आग ओकत होता त्यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन पारा 40 अंशा पर्यत गेला होता त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

मार्च महिन्यात ही परिस्थिती आहे तर पुढे काय होईल अशी चिंता सर्वाना लागली होती मात्र अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली आणि चक्क कडक उन्हाळ्यात पावसाळ्या सारखा पाऊस होत असल्यामुळे तापमानात मोठी घट झाली असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी पाऊस थांबल्या नंतर उकाड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...