Tuesday, November 17, 2026
Homeदेश विदेशबद्रीनाथजवळ ६ प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; बचावकार्य सुरु

बद्रीनाथजवळ ६ प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; बचावकार्य सुरु

बद्रीनाथ | Badrinath
चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतणारे ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ बेपत्ता झाल्यानंतर ते कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचा संपर्क आणि लोकेशन अचानक गायब झाल्यानंतर प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. या अपघातात सहाही जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही जोशीमठ परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्याची माहिती दिली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचं पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झालं. चमोलीचे अप्पर जिल्हाधिकारी विवेक प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी तातडीने सर्च आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली होती.

#WATCH | Uttarakhand: A team from the district administration is currently searching for the missing helicopter travelling from Badrinath to Dehradun.

Smoke was seen rising near Chaien village in Joshimath, following the disappearance of the helicopter. There are six people on board the helicopter, including five passengers and one pilot: Chamoli district administration— ANI (@ANI) October 30, 2026

- Advertisement -

पाच प्रवासी आणि एक पायलट हेलिकॉप्टरमध्ये
प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण होते. त्यात पाच प्रवासी आणि एका पायलटचा समावेश आहे. प्रवाशांची नावे चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व अशी असल्याचे काही समजते आहे. पायलटचे नाव हिमांशू असल्याची माहितीही समोर आली आहे.

बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतत असलेलं हे हेलिकॉप्टर जोशीमठ परिसरात अचानक बेपत्ता झालं. बद्रीनाथवरून उड्डाण केल्यानंतर जोशीमठमधील मारवाडी परिसरातील ‘चाय’ गावाजवळील टेकडीजवळ हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि त्यानंतर ते कोसळल्याचं समोर आले.

अपघात झालेलं हे हेलिकॉप्टर ‘ट्रान्स भारत’ (Trans Bharat) कंपनीचं असून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर VT-HCX असल्याची माहिती समोर आली आहे. बद्रीनाथ धामवरून दर्शन घेऊन परतल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.

ऑक्टोंबर महिन्यात चारधाम यात्रेदरम्यान दोन हेलिकॉप्टर्सची इमर्जन्सी लँडिंग झाली होती. यातली एक घटना रुद्रप्रयागमध्ये खराब हवामानामुळे घडली. टिहरीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. अपर जिल्हाधिकारी चमोली विवेक प्रकाश यांनी सांगितलं की, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बचाव मोहिम सुरु झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : थोरात, काळे, मुळा, ज्ञानेश्वर, अशोक आणि अगस्तीसह ढाकणेंकडून पहिली...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला असून, आतापर्यंत सुमारे 30 लाख 20 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप...