Sunday, June 7, 2026
Homeजळगाववादळी वाऱ्यासह पावसामुळे न्हावी येथे घरांची पडझड

वादळी वाऱ्यासह पावसामुळे न्हावी येथे घरांची पडझड

न्हावी Nhavi ता यावल वार्ताहर –

येथे शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे (rain with strong winds) अण्णाभाऊ साठे नगर मधील ८० ते ९० वर्षांपूर्वीचे झाड उन्मळून (Uprooted tree) पडून आजुबाजुच्या जवळ जवळ १२ ते १३ रहीवाशी कुटुंबाच्या घरांचे नुकसान (Damage to houses) झाले आहे. त्या नुकसान झालेल्या पडझड घरांचे पंचनामे (Punchnama) महसूल विभागातर्फे (Revenue Department) तलाठी ए .एस .महाजन यांनी केले.

- Advertisement -

यावेळी अडिच ते तिन लाख पर्यंत नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त होत असून आमच्या झालेल्या नुकसानीची तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्त कुटूबांकडून व्यक्त होत आहे .नुकसान ग्रस्त कुटूंबाची नांवे धोंडू कडू तायडे, रमेश तुकाराम मोरे, रामदास तुकाराम मोरे, दिपचंद मंगा मोरे, लक्ष्मण दिपचंद मोरे, श्रावण सुका मरसाळे, बाबू तुकाराम मयत वारस सुबाबाई रामा, विठ्ठल, गंगाराम ,सरस्वती बबन, यशवंत पुरुषोत्तम, भारत तुकाराम मोरे वारस सोनी भारत तसेच तडवी वाडा येथील कादर नामदार तडवी

तसेच परीसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे पोल व तारां तुटून पडल्याने विजपुरवठा खंडित झाला होता. तसेच या नुकसान ग्रस्त झालेल्या ठिकाणी सरपंच भारती चौधरी ,उप सरपंच उमेश बेंडाळे, दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, ग्रा पं सदस्य यशवंत तळेले, रविंद्र तायडे, वि का सो चेअरमन प्रविण वारके यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्काळ क्रेन च्या सहायाने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम दिवस भर सुरू होते.

ताज्या बातम्या