Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMAHA TET Paper Leak:पेपर फुटीच्या प्रकरणाने राज्य पुन्हा हादरले; TET पेपर कसा...

MAHA TET Paper Leak:पेपर फुटीच्या प्रकरणाने राज्य पुन्हा हादरले; TET पेपर कसा फुटला? भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले

मुंबई | Mumbai
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत २८ जून २०२६ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर २४ तासाआधीच म्हणजे आज फुटला आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी पहाटे टाकलेल्या एका धाडीमुळे टीईटीच्या पेपरफुटीचे बिंग फुटले. त्यामुळे या पेपरफुटीचे थेट ‘ठाणे कनेक्शन’ समोर आले आहे.

टीईटीचा पेपर नेमका कसा फुटला?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत २८ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र तरीही टीईटीचा पेपर फुटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

MAHA TET Exam Cancelled: मोठी बातमी! ‘नीट’ नंतर आता ‘टीईटी’चा पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द

भिवंडी पोलिसांना माहिती मिळाली आणि पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलिसांना एका गुप्त माहितीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून इतर राज्यांतून भिवंडीत आलेल्या तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांची त्यांची कसून झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे उद्या होणाऱ्या TET परीक्षेचे पेपर आढळून आले. प्राथमिक तपासात या इसमांकडे मिळालेले प्रश्न आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळतीजुळती असल्याचे समोर आल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले.

यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिका १०० टक्के फुटल्याचे स्पष्ट होताच भिवंडी पोलिसांनी संशयितांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

नीट परीक्षेतील गैरप्रकार पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यंदा सुरक्षेची कडक नियमावली तयार केली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधीच ठाणे जिल्ह्यातून पेपर लीक झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने रविवारी होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो डी.टी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र परिक्षा परीषदेने निवेदनात काय म्हंटले आहे?
सदर परिस्थिती लक्षात घेता २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परिक्षेची पुढील तारीख कधी जाहीर होणार?
टीईटी परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील सर्व अपडेट्स महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) जाहीर केले जातील, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मिशन सुधारमध्ये 13 हजार रेशनकार्ड बाद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सरकारच्यावतीने गरजू व पात्र रेशनकार्डधारकांनाच सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, यासाठी मिशन सुधार या कार्यक्रमांतर्गत रेशनकार्डाची छाननी सुरू आहे. यामध्ये अपात्र, बनावट,...