Saturday, September 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ​परदेश दौऱ्याची डिजिटल रेकी; कंपनीच्या संचालकाला ५२ लाखांना...

Nashik Crime News : ​परदेश दौऱ्याची डिजिटल रेकी; कंपनीच्या संचालकाला ५२ लाखांना घातला गंडा

कॉर्पोरेट सायबर फ्रॉड उघड

​नाशिक | Nashik

​नाशिकरोड (Nashik Road) येथील एका नामांकित कंपनीच्या संचालकाला तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घालणारा सायबर गुन्हेगारीचा (Cyber Criminal) पॅटर्न समोर आला आहे. संचालक परदेश दौऱ्यावर (Tour) असताना त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत, कंपनीच्या अकाउंटंटला बनावट व्हॉट्सॲप मेसेजद्वारे जाळ्यात ओढण्यात आले. या घटनेमुळे आता सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर कॉर्पोरेटमधील डिजिटल व्यवहार आणि सुरक्षिततेचे ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ तोकडे पडत आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik NMC News : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आयुक्त दालनाबाहेर ठाकरे- शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक वाद

​सायबर गुन्हेगारांनी या फसवणुकीसाठी टार्गेटेड पद्धत वापरली. कंपनीचे संचालक कामानिमित्त चीन दौऱ्यावर गेलेले आहेत, याची माहिती (डिजिटल रेकी) संशयितांकडे होती. याचाच गैरफायदा घेत संशयितांनी संचालकांच्या नावाने एका नवीन नंबरवरून कंपनीच्या अकाउंटंटला संपर्क साधला. “हा माझा नवीन नंबर आहे, सेव्ह करा” असा मेसेज पाठवून खात्री पटवली. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीच्या बँक खात्यात ५६ लाख रुपये असल्याचे अकाउंटंटकडून जाणून घेतले व “क्लायंटला तातडीने पैसे द्यायचे आहेत” असे सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. अकाउंटंटने संचालकांचा मेसेज समजून ५२ लाखांच्या पेमेंटची मंजुरी वरिष्ठ महिला संचालिकेकडे मागितली.

हे देखील वाचा : Nashik MHADA Scam : एसी केबिनमधून कागदपत्रांचा खेळ! दोन मंडल अधिकाऱ्यांच्या अटकेने तपासाला वेग

महिला (Woman) संचालिकेने नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार समजून चेक आणि आरटीजीएस फॉर्मवर स्वाक्षरी केली. बँकेतून ५२ लाख रुपये चाेरट्यांच्या खात्यात जमा झाले. यानंतर, संशयितांनी दुसऱ्या खात्यातून तब्बल १ कोटी ९८ लाख रुपये पाठवण्याची मागणी पुन्हा केली. मात्र, सुदैवाने पहिल्या ५२ लाखांच्या डेबिटचा मेसेज चीनमध्ये असलेल्या मूळ संचालकाला गेल्याने त्यांनी तातडीने फोन करून चौकशी केली पर्दाफाश झाला. याप्रकरणी ६३ वर्षीय महिला संचालिकेच्या फिर्यादीवरून नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) अज्ञातांविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे ज्या खात्यात वर्ग झाले, ते खाते आणि संबंधित मोबाईल नंबरचा माग सायबर पोलीस घेत आहेत.

कॉर्पोरेटला धोका

​१. सोशल मीडियावरून ‘रेकी’: कंपनीचे अधिकारी कधी परदेश दौऱ्यावर जात आहेत, याची माहिती गुन्हेगार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून किंवा ई-मेल हॅकिंगद्वारे मिळवत आहेत.
​२.व्हेरिफिकेशनचा अभाव: कोणताही आर्थिक व्यवहार करताना मेसेजवर विश्वास न ठेवता थेट फोनवरून किंवा ‘व्हॉइस/व्हिडिओ कॉल’द्वारे पडताळणी करण्याची पद्धत पाळली जात नाही.
​३. तातडीच्या नावाखाली चूक: ‘क्लायंटला लगेच पैसे द्यायचे आहेत’ अशी घाई निर्माण करून सायबर गुन्हेगार कर्मचाऱ्यांना विचार करायला वेळच देत नाहीत.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...