नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik
मानवाधिकारांमध्ये लोकांना (People) चांगले भवितव्य घडवणे व सक्षम करण्याची शक्ती आहे. जर सर्वांनी मानवी हक्कांच्या पूर्ण शक्तीचा स्वीकार केला आणि त्यावर विश्वास ठेवला तर जग अधिक समान, शांत आणि शाश्वत होईल. हाच संदेश आजचा मानवी हक्क दिन (Human Rights Day) देत आहे.
आज १० डिसेंबर मानवी हक्क दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने यंदाच्या मानवी हक्क दिलाची एक विशिष्ट श्रीम समोर आली आहे. २०२४ ची थीम आमचे हक्क, आमचे भविष्य ही आहे. १९४८ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणाच्या दत्तक स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिसमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (Mahasabha) घोषणापत्राची घोषणा केली, जी जगातील सर्व क्षेत्रांतील विविध कायदेशीर आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या प्रतिनिधींनी तयार केली होती.
प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार, हक्क व स्वातंत्र्य आहे. यासाठी आपण नेहमी सजग राहिले पाहिजे. आपल्या हक्कांसाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे. बोलले पाहिजे. जर कोणी आपले हक्क हिरावून घेत असेल तर आपण त्याविरुद्ध ठाम लढा दिला पाहिजे. आपण सर्व समान आहोत व सर्वांनाच समान हक्क, अधिकार आहेत. जेव्हा एका माणसाचे हक धोक्यात येतात तेव्हा प्रत्येक माणसाचे (Man) हक्क कमी होतात. म्हणून सर्वांनीच एकमेकाला पाठिंबा देऊन अन्यायाचा विरोध केला पाहिजे.
मानवाधिकार हा वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग इत्यादीच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही. मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हाच खऱ्या अथनि यामागचा उद्देश आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. जन्मापासूनच मानवाला मानवी हक्क मिळालेले असतात. त्यामुळे जात, लिंग, धर्म, भाषा, रंग आणि राष्ट्रीयत्व हे त्याच्या आड येत नाही. आपल्या देशात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवी हक्क कायदा (Human Rights Act) लागू झाला आणि सरकारने १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली.
दरम्यान, मानवी हक्कांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करण्याच्या एका विशिष्ट पैलूकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी एक थीम निवडली जाते. या थीममध्ये (Theme) भेदभाव समाप्त करणे, गरिबीशी लढा देणे, मानवी हक्क उल्लंघनाच्या बळींचे संरक्षण करणे यात समाविष्ट आहे. आमचे हक्क आणि आमचे भविष्य यावर या वर्षभरात काम झाले तर अनेकांचे भविष्य उज्ज्वल होईल.