Tuesday, October 13, 2026
Homeनाशिकनाशिकमध्ये गोणीत सापडले मानवी सांगाडे

नाशिकमध्ये गोणीत सापडले मानवी सांगाडे

पंचवटी । प्रतिनिधी Pan̄cavati

पेठरोडवरील एरंडवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सदर मानवी कवट्या असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली असून मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या, कुठून आणल्या, तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती. तर कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जात असून, भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. तर याबाबत आढळलेल्या मानवी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गोणीत मानवी हाडे आणि कवट्या खर्‍या नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र या मागचा सूत्रधार व त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

पोलिसांनी हे सर्व ताब्यात घेत मंदिराच्या पुज्यार्‍याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत अधिक माहिती घेतली असता ही मानवी हाडे व कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे समजते. मात्र मंदिराजवळ हे सर्व गोणीत कोणी ठेवले किंवा कोणी आणल्या याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

मात्र परिसरातील नागरिकांकडे चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमका काय प्रकार होता, हे कळू शकेल तर पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सिल्व्हर ओकमध्ये खलबतं

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट...