Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकारने पाठलाग करत दुचाकीला दिली धडक; दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू; कार चालकावर खुनाचा...

कारने पाठलाग करत दुचाकीला दिली धडक; दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू; कार चालकावर खुनाचा गुन्हा दाखल

- Advertisement -

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी Shirvade

दि.१ नोव्हे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खेडलेझुंगे ते ब्राम्हणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी विश्वनाथ एकनाथ दराडे, वय २९, व्यवसाय वकील, रा.खंबाळे ता. सिन्नर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.१ नोव्हें रोजी दुपारी जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून फिर्यादीचे मयत मोठे भाऊ व वहीणी यांच्यासोबत आरोपी भाऊसाहेब साबळे याचा वाद झाला होता.

त्यानंतर आरोपीने आपल्या ताब्यातील इको चारचाकी क्र.एम.एच.१५ जे.एस.१९५४ द्वारे फिर्यादीच्या भावाच्या क्र.एम.एच.१५ बी वाय ५७२५ या मोटारसायकलचा डोंगरगावपासून पाठलाग करत खेडलेझुंगे ते ब्राम्हणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली.

या धडकेत पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भाऊसाहेब सखाहरी साबळे, रा. डोंगरगाव, ता.निफाड याच्याविरुद्ध भा.न्या.सं.२०२३ चे कलम १०३(१), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एसआयआर मोहिमेची पूर्व तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मतदार याद्या अचूक आणि बीएलओंकडून गृहभेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून बारा विधानसभा मतदारसंघांत...