Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : पती-पत्नीचे फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

Crime News : पती-पत्नीचे फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

पारनेरच्या तरूणाची सायबर पोलिसांत फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पती-पत्नीचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरून त्यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील कुरूंद येथील 28 वर्षीय तरूणाने मंगळवारी (1 सप्टेंबर) येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजेपासून ते 7 मे 2026 रोजी रात्री 11.20 वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले. या अकाउंटवर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

आपल्या नावाने कोणीतरी बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्यावर स्वतःचे व पत्नीचे फोटो वापरल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात बनावट अकाउंटधारकाविरूध्द कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या आधारे तपास सुरू आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...