Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमनांदावयास येत नाही म्हणून पतीने केला पत्नीवर चाकूने वार

नांदावयास येत नाही म्हणून पतीने केला पत्नीवर चाकूने वार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तुमच्यासोबत नांदावयास येणार नाही म्हणताच पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकुने वार (Knife Attack) केल्याची घटना तालुक्यातील चासनळी (Chasnali) येथे घडली. पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वत:वरही चाकुने वार करून घेतले. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जखमी संगिता सुभाष सोनवणे (वय 22) हीचे लग्न नांदगाव (Nandgav) तालुक्यातील सोयेगाव येथील सुभाष हिरामण सोनवणे यांच्यासोबत झालेले आहे. परंतु संगिता सध्या चासनळी येथे मामा अण्णा वामण बर्डे यांच्या घरी राहते. दि. 11 जुलै रोजी सुभाष सोनवणे पत्नी संगिताला सोयेगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याने पत्नीला सासरी चल म्हणला, त्यावर तीने सासरी जाण्यास नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात सुभाषने दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकुने वार केले.

गळ्यावर वार केल्याने संगिता जखमी (Injured) झाली. त्यानंतर सुभाषने स्वत:च्या गळ्यावरही वार करून घेतले. दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव (Kopargav) येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अण्णा वामण बर्डे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुभाष सोनवणे विरूद्ध बीएनएस 2023 चे कलम 109 (1) 352, 251, (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम. जे. महाजन हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या