Friday, July 3, 2026
Homeजळगावठाणेदाराचे नाव सांगून मागितली दारू : महिला पोहेकॉ निलंबीत

ठाणेदाराचे नाव सांगून मागितली दारू : महिला पोहेकॉ निलंबीत

खामगांव येथील नियंत्रण कक्षातील महिला पोहेका अनिता इर्शिद यांनी ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार शेख यांच्या नावाने शेगाव रोडवरील हॉटेल प्राईडच्या मालकाला दारूची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
खामगाव नियंत्रण कक्षातील महिला पोहेकॉ अनिता इर्शिद या १० मे २०२० रोजी कर्तव्यावर असतांना त्यांनी शेगाव रोडवरील हॉटेल प्राईड येथे जावून हॉटेलचे मालक योगेश जाधव यांना मोबाईलवर ‘आमच्या साहेबांनी दारू मागीतली’ असे सांगितले. यावेळी जाधव यांनी ठाणेदार शेख यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी या गोष्टीला नकार दिला.
यावेळी योगेश जाधव यांनी पोहेकॉ अनिता इर्शिद यांचेशी मोबाईलवर झालेले संभाषणाची क्लिप ठाणेदार शेख यांना पाठविली. यावरून संतापलेल्या ठाणेदार शेख यांनी याबाबत चौकशी करून पोहेकॉ अनिता इर्शिद विरूध्द जिल्हा पोलिस अधिक्षकांना अहवाल पाठविला.
अहवालावरून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी पोहेकॉ अनिता इर्शिद यांना तातडीने निलंबीत केले आहे. एखाद्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे अशा प्रकारे निलंबन होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असून या प्रकाराची पोलिस वर्तुळासह  खामगांव शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...