मुंबई | वृत्तसंस्था Mumbai
नाशिक मधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या नंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
समाजात जगत असताना आपण कुणाला न कुणाला गुरु मानत असतो, त्या नुसार अशोक खरातला मी आणि माझ्या कुटुंबाकडून अध्यात्मिक गुरु मानण्यात आलेलं होत., अध्यात्मिक श्रद्धेतून अशोक खरातवर विश्वास ठेवला होता. मात्र, अशोक खरातची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती. एखादा व्यक्ती पुढे जाऊन कसा वागेल याची माहिती आपल्याला नव्हती. खरात दाम्पत्याला गुरू मानल्याने त्याची पाद्यपूजा केली असल्याचं रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलं. अशोक खरातने केलेले कृत्य हे घाणेरड असून या प्रकरणात सखोल तपासणी व्हावी असे त्यांनी म्हण्टले आहे.
दरम्यान समाजमाध्यमांवर माझ्याविषयी बदनामी आणि टीका करणाऱ्यांवर कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.




