Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedT-20 world cup: आयसीसीकडून बीसीसीआयला 26 दिवसांचा अल्टीमेटम

T-20 world cup: आयसीसीकडून बीसीसीआयला 26 दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई I mumbai

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि गंभीर परिस्थिती पाहून येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या टी २० विश्वचषकाच्या आयोजनासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी आयसीसीने बीसीसीआयला २६ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून यासंदर्भातील निर्णय बीसीसीआयला लवकरच जाहीर करावा लागणार आहे…

- Advertisement -

याबाबत बीसीसीआय प्रेसिडेंट सौरव गांगुली म्हणाले की, आम्ही भारतातील कोरोना महामारीचा आढावा घेतल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करणार आहोत. आयसीसीने दुबईमध्ये काल व्यर्च्युअल बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बीसीसीआय प्रेसिडेंट सौरव गांगुली आणि सचिव जय शाह ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

बैठकीत टी २० विश्वचषक आयोजनासंदर्भात सखोल बातचीत करण्यात आली. भारतात काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या महामारीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सामने आयोजित करताना भरपूर अडचणींचा बीसीसीआयला सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये यूएईत विश्वचषकाच्या सामान्यांचे आयोजन केले जाऊ शकते. असे मत आयसीसीने या बैठकीत स्पष्ट केले आहे.

वनडे विश्वचषकात एकूण १४ संघांचा समावेश असेल. तर टी २० विश्वचषकात २० संघांना संधी मिळणार आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. २०२७ आणि २०३१ वनडे विश्वचषकात १४ संघांना संधी मिळेल. तर २०२४, २०२६, २०२८, २०३० मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकात २० संघांना संधी मिळेल. २०२५ आणि २०२९ मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ८ संघांना संधी मिळेल.

सलील परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या