Monday, October 14, 2024
Homeक्रीडाICC Test Ranking: हिटमॅन रोहित शर्माची टॉप-५ मध्ये एन्ट्री! विराट, जयस्वाल यांचीही...

ICC Test Ranking: हिटमॅन रोहित शर्माची टॉप-५ मध्ये एन्ट्री! विराट, जयस्वाल यांचीही मोठी झेप

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आयसीसीने बुधवारी नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय संघाचा कर्णधार आणि हिटमॅन फलंदाज रोहित शर्माने क्रमवारीत झेप घेतली आहे. त्याने कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली आहे. या यादीत टॉप १० मध्ये असलेल्या फलदाजांची नवी यादी पाहायला मिळाले आहे. कर्णधार रोहित शर्मा सोबतच विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांचा ही समावेश आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल 3 वर्षांनंतर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे. त्याला फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघ ५ महिन्यांपूर्वी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. रोहित शानदार फॉर्ममध्ये आहे जर बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हिटमॅनच्या बॅटमधून धावा बरसल्या तर तो क्रमवारीत आणखी मोठी झेप घेऊ शकतो.

- Advertisement -

मार्चनंतर भारतीय संघाने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तरीदेखील ७५१ रेटींग पॉईंट्ससह रोहित पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर यशस्वी जयस्वाल (७४० रेटींग पॉईंट्स) आणि विराट कोहली (७३७ रेटींग पॉईंट्स) यांनाही फायदा झाला आहे. यशस्वी जयस्वाल सहाव्या तर विराट कोहली सातव्या स्थानी पोहोचला आहे.

आयसीसी क्रमवारीतील अव्वल १० खेळाडू
जो रूट (इंग्लंड) : 899 रेटींग केन विल्यमसन (न्यूझीलंड) : 859 रेटींग डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) : 768 रेटींग स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) : 757 रेटींग रोहित शर्मा (भारत) : 751 रेटींग यशस्वी जैस्वाल (भारत) : 740 रेटींग विराट कोहली (भारत) : 737 रेटींग उस्मान ख्वाज (ऑस्ट्रेलिया) : 728 रेटींग मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) : 720 रेटींग मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) : 720 रेटींग

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या