Wednesday, October 9, 2024
Homeदेश विदेशIsrael Hezbollah War : इस्राइलचा हिज्बुल्लाहवर एअर स्ट्राईक; हवाई हल्ल्यात दहशतवादी हसन...

Israel Hezbollah War : इस्राइलचा हिज्बुल्लाहवर एअर स्ट्राईक; हवाई हल्ल्यात दहशतवादी हसन नसराल्लाहचा खात्मा, IDFचा दावा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हिज्बुल्लाह विरोधात सुरु केलेल्या लढाईत इस्रायलला मोठे यश मिळाले आहे. इस्रायलने लेबनानकडे वर केलेल्या हल्ल्यात हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा केला आहे. इस्रायली संरक्षण दलाने एक्सवर पोस्ट करत, आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत, असे म्हटले आहे. हसन नसरल्ला ३२ वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता.

इस्रायलने लेबनानची राजधानी बेरुतमध्ये हिज्बुल्लाहच्या मुख्यालयावर भीषण हल्ला करण्यात आला. IDF ने ५० च्या वर बंकरविरोधी रॉकेटने हिज्बुल्लाहच्या मुख्यालयावर डागले. हिज्बुल्लाहच्या म्होरक्याला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असे इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले होते. या हल्ल्यात हिज्बुल्लाह प्रमुख असलेला नसरल्लाह मारला गेला की नाही? या बद्दल लगेच काही बोलणे घाईच ठरेल, असे हल्ल्यानंतर इस्रायलने म्हटले होते. पण आता इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने अधिकृत हँडलवर पोस्ट करुन हसन नसरल्लाह मारला गेल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

काय म्हंटले आयडीएफने?
IDF ने म्हटले की, “इस्रायल लष्कराने नसरल्लाहसह हेजबोलाच्या अतिरिक्त कमांडर्सना देखील ठार केले. यापूर्वी इस्रायली लष्कराने दावा केला होता की, त्यांनी लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यांदरम्यान अनेक हेजबोला कमांडर मारले आहेत. नसराल्लाहच्या मृत्यूला लेबनॉन आणि हेजबोला यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. नसराल्लाहच्या मृत्यूची पुष्टी करत इस्रायली आर्मी आयडीएफने ट्विटरवर पोस्ट केले, ‘हसन नसराल्लाह यापुढे जगात दहशत माजवू शकणार नाही.’

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डेव्हिड अव्राहम यांनी सांगितले की, “लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये शुक्रवारी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुकाचा खात्मा झाला आहे. हसन नसराल्लाहला मारण्यासाठी ऑपरेशन NEW ORDER राबवण्यात आले होते.” एवढेच नाही तर, जो कुणी इस्रायलला धमकी देईल, त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेक इमारती कोसळल्या, त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेस सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील घरे हादरली. “इस्रायल संरक्षण दलांनी हेजबोला दहशतवादी संघटनेच्या मध्यवर्ती मुख्यालयावर अचूक स्ट्राइक करण्यात आला. आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक कारवाई केली. जेणेकरून इस्रायली कुटुंबे त्यांच्या घरात, सुरक्षितपणे राहू शकतील”, असे IDF च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या