Saturday, September 12, 2026
Homeक्राईमJamkhed : अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या हॉटेलवर पोलिसांचा छापा

Jamkhed : अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या हॉटेलवर पोलिसांचा छापा

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त || तिघांना अटक

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड परिसरात (Jamkhed) अवैधरित्या दारू विक्री (Illegal Alcohol Sale) करणार्या हॉटेलवर अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने छापा (Raid) टाकत एक लाख वीस हजार 465 रुपये मुद्देमाल जप्त (Seized) करत तिघांना जेरबंद केले आहे.

- Advertisement -

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी पोलीसांचे विशेष पथक तयार करून सदर पथकास जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने बुधवारी (दि. 18) गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड (Jamkhed) येथील हॉटेल पाटील वाडा येथे छापा टाकत 26 हजार 910 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा (Domestic And Foreign Liquor Stock) व 15 हजार 270 रुपये रोख रक्कम असा एकूण 42 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत हॉटेल मालक किसन सुरेश जरे यास ताब्यात घेतले.

यानंतर पथकाने जामखेड येथील खर्डा रोडवरील (Kharda Road) हॉटेल साई लाँजिंग येथे छापा (Raid) टाकत येथे विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूचा एकूण 78 हजार 285 रुपयांचा अवैध माल ताब्यात घेऊन जप्त (Seized) केला. पोलिसांनी हॉटेल मालक सचिन विक्रम तनपुरे व सतिश नवनाथ पवार (दोन्ही रा. शिऊर, जामखेड) यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

कलाकेंद्रावर कारवाई कधी करणार ?

जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा (Gutkha) विक्री राजरोसपणे सुरू आहे. तसेच कलाकेंद्रात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. नियमांचे पालन केले जात नाही. यावर कधी कारवाई केली जाणार? असा प्रश्न जामखेडकरांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...