Monday, December 2, 2024
Homeक्राईमकोंभाळणे येथील अवैध दारु विक्रेत्यावर छापा

कोंभाळणे येथील अवैध दारु विक्रेत्यावर छापा

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कोंभाळणे अवैधरित्या दारु विक्रेत्यावर अकोले पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.28) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकून देशी-विदेशी दारुसह 55 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंभाळणे येथे अवैध दारु विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

- Advertisement -

पथकाने छापा टाकला असता संतू हनुमंत सदगीर (वय 59) हा दारु विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून 53 हजार 690 रुपयांची देशी दारु आणि 1360 रुपयांची विदेशी दारु असा एकूण 55 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. प्रदीप बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संतू सदगीर याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. खाडे हे करत आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या