Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमअवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा छापा

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा छापा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील साकूर (Sakur) येथे अवैधरित्या गॅसटाक्या रिफिलिंग सेंटरवर (Illegal Gas Tank Refilling Center) उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात (Police Raid) सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई बुधवारी (ता. 25) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास केली आहे.

- Advertisement -

याबाबत घारगाव पोलिसांकडून (Ghargav Police) मिळालेली अधिक माहिती अशी, की उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की साकूरमधील तीरवाडी चौकातील एका गाळ्यात अवैधरित्या गॅसची विक्री व रिफिलिंग करत आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. यावरुन पथकातील पोना. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे, घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोहेकॉ. ढोकरे, खाडे आदिंनी सदर ठिकाणी छापा (Raid) टाकला असता तेथे घरगुती गॅस वापराच्या 40 टाक्या, व्यापारी गॅसटाकी 1, रिफिलिंग मशिन, वजन काटा व चौदाशे रुपये रोख असा एकूण 97 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी पोना. राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन योगेश सुभाष तीरवाडी (वय 52) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस (Ghargav Police) करत आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या