Sunday, July 26, 2026
HomeनगरCrime News : एमआयडीसी हद्दीत चार लाखांचा गुटखा पकडला

Crime News : एमआयडीसी हद्दीत चार लाखांचा गुटखा पकडला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील निंबळक बायपास उड्डाणपुलाजवळील एक किराणा दुकान आणि विळद घाट येथील एका हॉटेलवर गुरूवारी (30 ऑक्टोबर) छापे टाकले. या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे चार लाख रूपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी बापु मच्छिंद्र कोतकर (वय 40, रा. निंबळक बायपास) आणि माऊली उर्फ ज्ञानेश्‍वर गायकवाड (रा. हॉटेल हर्षदा, विळद घाट) या दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार विष्णू भागवत यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. निंबळक उड्डाणपुलाजवळील रेणुका किराणा स्टोअर्समध्ये आणि अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल हर्षदामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरूवारी सकाळी दोन्ही ठिकाणी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांना विविध कंपनीचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून एकूण चार लाख पाच हजार 585 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Earthquake News : कळवण–सुरगाणा तालुक्यात मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

0
नाशिक | Nashik जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये शनिवार (दि.२६) रोजी दिवसभरात आणि रात्रीच्या सुमारास भूकंपाचे लागोपाठ धक्के जाणवले होते. सुदैवाने या घटनेत...