Wednesday, September 2, 2026
Homeक्राईमCrime News : पाथर्डीत मटका अड्ड्यांवर एलसीबीचा छापा

Crime News : पाथर्डीत मटका अड्ड्यांवर एलसीबीचा छापा

5 लाख 18 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त, अनेकजण ताब्यात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील अवैध मटका धंद्याविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 8) धडक कारवाई केली. शहरातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन असा सुमारे 5 लाख 18 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, प्रकाश मांडगे व सतीश भवर यांनी पाथर्डी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

माणिकदौंडी चौकात स्विफ्ट कारमधून मटका घेतांना अतुफ खलील शेख (32) व अवेज जावेद शेख (27), रा. माळी बाभुळगाव, ता. पाथर्डी यांना ताब्यात घेऊन रोख रक्कम, दोन मोबाईल व स्विफ्ट कार असा 4 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिंचपूर रोडवरील मराठी शाळेसमोर अतिक अब्दुलवहाब शेख (37), रा. चिंचपूर रोड, कुंभारभट्टी, पाथर्डी याच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल व टीव्हीएस व्हेगो दुचाकी असा 60 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिक शेख हा इजाज शेख व लखन उर्फ इस्माईल शेख यांच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आखार भागात मनोज बाळू भागवत (26), रा. आखार भाग, पाथर्डी याच्याकडून रोख रक्कम व आयफोन-13 असा 33 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल, तर त्याच परिसरात अविनाश बाबासाहेब पाचारणे (31), रा. कजबा पेठ, पाथर्डी याच्याकडून रोख रक्कम, सॅमसंग मोबाईल व होंडा शाईन दुचाकी असा 73 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अविनाश पाचारणे यानेही इजाज शेख व लखन उर्फ इस्माईल शेख यांच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

कोरडगाव रोडवरील सोसायटी पेट्रोल पंपासमोर विजय राम खोले (59), रा. इंदिरानगर, पाथर्डी याच्याकडून रोख रक्कम व मटका खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तो कोणासाठी मटका घेत होता, याचा तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणांत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे अवैध मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २ सप्टेंबर २०२६ – हक्कासाठी आंदोलने का करावी लागतात?

0
न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. परंतु, नागरिकांना मूलभूत गोष्टींसाठी प्रत्येक वेळी आंदोलनाचा किंवा उपोषणाचा...