Thursday, October 29, 2026
HomeनगरRahuri : अवैध वाळू वाहतुकीचा पाठलाग करताना धक्काबुक्की

Rahuri : अवैध वाळू वाहतुकीचा पाठलाग करताना धक्काबुक्की

अधिकार्‍याला ढंपरमधून खाली ढकलून वाहनासह पलायन

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि तस्करी करणार्‍यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका आधिकार्‍यावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) सायंकाळी चिंचोली परिसरात घडली. कारवाईदरम्यान आधिकार्‍याला धक्काबुक्की करून ढंपरमधून खाली ढकलण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी ढंपरसह घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारामुळे महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महसूलचे एक आधिकारी मंगळवारी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदीपात्रातील अधिकृत वाळू लिलावासंदर्भातील दप्तर तपासणीसाठी गेले होते. यावेळी त्यांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक हायवा ढंपर आढळून आला. त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पिंपळगाव फुणगी परिसरापर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांनी ढंपर अडविला.

यानंतर सदर आधिकारी हे स्वतः ढंपरच्या केबिनमध्ये बसले आणि त्यांनी चालकाला वाहन राहुरी तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. मात्र, याच वेळी पाच ते सहा जणांनी तेथे येत सदर आधिकार्‍याला धक्काबुक्की करून ढंपरमधून खाली ढकलून देत वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या वरिष्ठ महसूल अधिकार्‍यालाच अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतरही संबधित आधिकार्‍याने हार न मानता सुमारे 20 किलोमीटरपर्यंत संबंधित ढंपरचा पाठलाग केला. मात्र, चालकाने पुन्हा चिंचोली येथील नदीपात्रात ढंपर नेऊन त्यातील वाळू खाली केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवरच हल्ले होत असल्याने वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोपरगाव, राहुरीत तीन ठिकाणी छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत येथील अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव आणि राहुरी येथे तीन ठिकाणी...