Friday, April 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIMD Rain Alert: सावधान! महाराष्ट्रात पुढील ४ दिवसांत अस्मानी संकट कोसळणार? 'या'...

IMD Rain Alert: सावधान! महाराष्ट्रात पुढील ४ दिवसांत अस्मानी संकट कोसळणार? ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता, IMD ने जारी केला अंदाज

मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे, तर काही राज्यांत पावसासाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. याचे कारण अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याने पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाची चांगली हजेरी राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

कुठे कुठे अलर्ट देण्यात आला?
आयएमडीने २२ जुलै रोजी हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. यानुसार, मुंबई व उपनगरासह ठाणे ,पालघर तसेच संपूर्ण कोकणपट्टीला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात अमरावती नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाचा अंदाज
बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. दरम्यान अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्या असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची उसंत राहील. मात्र घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
22 जुलै
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सातारा कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर,पुणे घाटमाथा, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी.
23 जुलै :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी
24 जुलै :
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,पुणे -सातारा – कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथासह वाशिम ,बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा येलो अलर्ट जारी
25 जुलै :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, पुणे – सातारा – कोल्हापूर घाटमाथा ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई ,ठाणे, संपूर्ण विदर्भ, हिंगोली, नांदेड येलो अलर्ट जारी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

0
नाशिक| जिमाका वृत्तसेवा Nashik ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’च्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात येणार असून,जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग वाढविणे आणि शाश्वत पाणी...