Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; उद्या बहुमत चाचणीचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; उद्या बहुमत चाचणीचे निर्देश

दिल्ली | प्रतिनिधी

राज्यातील अस्थिर सरकारच्या परिस्थिती बाबत बहुमत चाचणी , व आमदार अपात्रता विषयी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने उद्या महाविकास आघाडी सरकारने बहुमत चाचणी द्यावी असे निर्देश दिले आहेत. यात ठाकरे सरकार बहुमत चाचणीस सामोरे जाणार का हे सुद्धा तेवढेच महत्वपूर्ण ठरणार आहे.

- Advertisement -

यात शिवसेने कडून अभिषेक सिंघवी, शिंदे गटाकडून निरज कौल तर राज्यपालांकडून सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला.

शिवसेनेकडून अभिषेक सिंघवी यांनी जोरदार युक्क्तीवाद केला. शिंदे गटासाठी एवढी घाई का ? असा सवाल सिंघवी यांनी करत राज्यपालांनी बहुमत चाचणी साठी मुख्यमंत्री किंवा मंत्रीमंळाशी चर्चा करायला हवी होती. बहुमत चाचणी साठी आम्हाला वेळ द्यावा, आजच बहुमत चाचणी जाहीर करून कमी कालावधी मिळत आहे. त्याच प्रमाणे काही आमदार करोनाग्रस्त आहेत, बहुमत चाचणी करण्या आगोदर आमदार अपात्रतेवरील याचिकेचा निर्णय होऊ द्या. किंवा अपात्रतेची याचिकेची सुनावणी लवकर करावी व त्यानंतर बहुमत चाचणी करावी अशी मागणी न्यायालयाकडे सिंघवी यांनी शिवसेने कडून केली.

शिंदे गटाचे वकील निरज कौल यांनीही जोरदार युक्तीवाद करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निर्णयाचे समर्थन करत राज्यपालांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले, त्याच बरोबर बहुमत चाचणी बाबत चा निर्णय योग्यच असल्याचा युक्तीवाद करत शिवसेना बहुमत चाचणीस का सामोरे जात नाही, बहुमत चाचणी केली तर त्यात गैर काय, असा ही सवाल कौल यांनी केला. दरम्यान ५५ पैकी ३९ आमदार शिंदे गटात असून आम्हीच शिवसेना आहोत , पक्षातील केवळ १४ आमदारांचा विरोध आहे.

राज्यपालांकडून सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तीवाद करत ३९ आमदारांच्या जीवाला धोका होता.त्यात त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत राज्यपाल हे ह्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते.राज्यपालांना आलेली सर्व पत्र त्यांनी तपासलेली होती म्हणूनच बहुमत चाचणीचा निर्णय घेतला असल्याचे मेहता यांनी सांगितले.सरकार अल्प मतात असताना विधान सभा उपाध्यक्ष यांच्या निर्णयावर आक्षेप घेत बहुमत चाचणी साठी राज्यपालांना कुठल्याही सूचनेची आवश्यकता नसल्याचे मेहता यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या