Sunday, February 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIncome Tax Raid : पक्षांतर करण्यापूर्वीच बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Income Tax Raid : पक्षांतर करण्यापूर्वीच बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

शरद पवारांच्या गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची होती चर्चा

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा (Raid) टाकल्याची माहिती समोर आली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,’आज सकाळच्या सुमारास आयकर विभागाचे पथक संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याचे बोलले जात आहे. घराच्या (House) आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तसेच त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले असून या छाप्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशिवाय त्यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर (Raghunatharaja Naik Nimbalkar) यांच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी (NCP Ajit Pawar) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे.संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता संजीवराजे हे अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या