Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारी आणि तर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै २०२५ पासून लागू होईल.

- Advertisement -

वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे दिली. वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल. तर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचेही जयस्वाल म्हणाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलात 84 अंमलदारांच्या विनंती बदल्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा पोलीस दलातील बदल्यांच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई अशा एकूण 84...