Thursday, September 10, 2026
Homeक्राईमCrime News : सावेडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित गजाआड

Crime News : सावेडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित गजाआड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरातून जप्त केलेल्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. जमीर निसार शेख (रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची (29 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

19 जुलै रोजी तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक सावेडी परिसरात गस्त घालत असताना मिस्किनमळा येथे एक कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी या कारमधील झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांना ताब्यात घेतले. तर, जमीर शेख व त्याचा साथीदार पसार झाला आहे. कारमध्ये सुमारे 150 ग्रॅम मेफेड्रोन, दरोड्याचे साहित्य मिळून आले. तिघांच्या चौकशीत आणखी तिघांची नावे समोर आलेल्या अली शेख, दानिश शेख, कासिफ खान यांनाही अटक करण्यात आली होती. ते सर्व सध्या पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यान, अटकेतील दानिश शेख याच्या मुकुंदनगर येथील घराची झडती घेतली. त्याच्या घरात आणखी पाच ग्रॅम मेफेड्रोन मिळून आले आहे. तर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जमीर शेख हा पसार होता. तो मुकुंदनगर भागात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह सापळा रचून जमीर शेख याला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यानेच ड्रग्ज विक्रीसाठी अहिल्यानगर शहरात आणले असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीकोनातून त्याच्याकडे तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...