Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमCrime News : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला

Crime News : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चारित्र्यावर संशय घेत पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडका व धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील ठाणगे मळा परिसरात शनिवारी (25 जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी जखमी महिलेच्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या ठाणगे मळा येथे गेल्या सुमारे 20 वर्षांपासून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती शिवाजी पवार याला दारूचे व्यसन असून तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने संशयित आरोपी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून माळीवाडा येथे स्वतंत्र राहत होता. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरात झोपण्याची तयारी करत असताना संशयित पती अचानक घरी आला. कोणतेही कारण नसताना त्याने पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर घराजवळील लाकडी दांडका उचलून त्यांना मारहाण केली. तसेच त्याच्याकडील धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले.

मारहाणीदरम्यान फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे दोन मुले घरात आले. त्यावेळी संशयित आरोपीने पत्नीसह दोन्ही मुलांना तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी फिर्यादीला त्यांच्या मुलांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शिवाजी पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : आत्मविश्वास की वास्तवाशी फारकत?

0
नाशिक / शैलेंद्र तनपुरे - दै. देशदूत - संपादक बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी एक आव्हान देणारी उक्ती मराठी भाषेत आहे....